मंगळवेढा – तालुका ग्राहक पंचायतीच्या वतीने मंगळवेढा बस स्थानकात प्रवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रवाशांचे हक्क, सुरक्षित व दर्जेदार सेवा याबाबत जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमास एसटी महामंडळाचे स्थानक प्रमुख शरद वाघमारे, ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष दत्तात्रय कोरे, सचिव डॉ. शरण बिराजदार, ग्रामपंचायत सदस्य भारत गवळी,
माजी कृषी अधिकारी शशिकांत रोकडे, वाहतूक निरीक्षक योगेश गवळी, वाहतूक नियंत्रक संतोष चव्हान, वाहतूक नियंत्रक अनिल पाटील, सहायक कार्यकारी अधीक्षक दत्तात्रय मोरे, अमोल काळे, धनाजीराव पाटील, वाहक सुमन कुंभार, भीमराव कदरकर, ज्येष्ठ प्रवासी माणिक पाटील, शशिकांत मणगल्ले आदी उपस्थित होते.
यावेळी प्रवाशांशी संवाद साधत त्यांना मिळणाऱ्या सुविधा, तक्रार निवारण व्यवस्था तसेच सुरक्षित प्रवासाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. एसटी प्रशासन व ग्राहक पंचायत यांच्या समन्वयातून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविले जातील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.प्रवासी हा एसटी सेवेचा केंद्रबिंदू आहे. प्रवाशांचे हक्क जपले गेले तरच सेवा अधिक सक्षम होईल. प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व सन्मानजनक प्रवास मिळावा यासाठी ग्राहक पंचायत सातत्याने प्रयत्नशील राहील,असे तालुका ग्राहक पंचायत सचिव शरण बिराजदार यांनी याप्रसंगी सांगितले.
मंगळवेढा बस स्थानकात ग्राहक पंचायततर्फे प्रवासी दिन साजरा करताना उपस्थित एसटी अधिकारी, पदाधिकारी व प्रवासी.


























