महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सोपविले आहे. त्यानुसार हे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत केले जाणार आहे. सर्वेक्षण योग्य प्रकारे करण्याकरिता प्रत्येक तालुक्यात प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या नोडल ऑफिसर, सहाय्यक नोडल ऑफिसर, तालुकास्तरावर नेमण्यात आलेले प्रशिक्षक त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी,मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी अशा एकूण २१ जणांना सुप्रसिद्ध गोखले इन्स्टिट्यूट मधील तज्ञ प्रशिक्षकांकडून (Masters Trainers) दि.२० जानेवारी २०२४ रोजी प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेतलेले हे प्रशिक्षक दि.२१ व २२ जानेवारी २०२४ रोजी तालुक्याच्या ठिकाणी
तालुकास्तरीय प्रशिक्षक,तालुक्यासाठी नियुक्त पर्यवेक्षक (SuperVisor) व प्रगणकांना (Enemurators) प्रशिक्षण देणार आहेत.
जिल्हयात ३ हजार १६८ प्रगणक व २५८ पर्यवेक्षक असे एकूण ३ हजार ४२६ कर्मचारी सर्वेक्षणासाठी नियुक्त आहेत.
त्यानुषंगाने व आयोगाच्या सूचनांनुसार तालुकास्तरीय नियुक्त पर्यवेक्षक (SuperVisor) व प्रगणकांकडून(Enemurators) दि.२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत सर्वेक्षणाचे काम पूर्ण होणार असून या सर्वेक्षण कामकाजात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.