लोहा – प्राचार्य वसंत बिरादार पाटील महात्मा फुले महाविद्यालय यांना महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीरच्या मराठी विभागाकडून देण्यात येणारा यंदाचा ‘संत तुकाराम पुरस्कार’ जाहीर झाला आहे .हा पुरस्काराचे वितरण उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात २३ जानेवारी २६ रोजी होणार आहे.
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे दरवर्षी माजी विद्यार्थ्यांपैकी एकाला, त्यांच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन ‘जगद्गुरु संत तुकाराम’ महाराजांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरविले जाते. या पुरस्काराचे चौथे वर्ष आहे, २०२६ चा मानाचा पुरस्कार अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य तथा लेखक, समीक्षक, जेष्ठ पत्रकार, कथा- कादंबरीकार प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांना जाहीर केल्याचे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, संयोजक मराठी विभाग प्रमुख डॉ. दीपक चिद्दरवार यांनी कळविले आहे.
येत्या २३ जानेवारी रोजी उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात समारंभपूर्वक, मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांना ‘संत तुकाराम पुरस्कार ‘ देऊन गौरविण्यात येणार आहे, असे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के व डॉ. दीपक चिद्दरवार यांनी कळविले आहे.
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव पी. टी. शिंदे यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच महात्मा फुले महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.























