जेऊर – करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे नुकतेच नियुक्त झालेले इंग्रजी विषयाचे प्राध्यापक व प्रभारी प्राचार्य डॉ.माने ए.पी यांना पु.अ.हो.सो.विद्यापीठ, सोलापूर येथे झालेल्या बोलींचा जागर या शासकीय पातळीवरच्या उपक्रमांमध्ये आपले संशोधन सादर करण्याचा संधी मिळाली. यामध्ये प्राचार्य माने सर यांनी बोलीभाषा संदर्भात बोलताना ‘कैकाडी भाषा स्वरूप इतिहास व सद्यस्थिती’ या विषयावर आपले पीएच. डी. चे संशोधन व भाषेतील काही गोष्टी उलगडून दाखवल्या आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
सोलापूर जिल्ह्यातून बोलींचा जागर या कार्यक्रमांतर्गत दोन व्याख्यात्यांनी कैकाडी भाषा आणि सोलापूरी बोली यावर संशोधनपर सादरीकरण केले . कैकाडी भाषेच्या संदर्भात केलेले डॉ.ए.पी माने सर यांचे संशोधन मोलाचे ठरले व त्यांची मांडणी श्रोत्यांना भारावून गेली.
हा कार्यक्रम विद्यापीठाच्या मुख्य सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा वांड:मय संकुले यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये भाषा व वांड:मय विभागाच्या संचालिका डॉ. अंजना लावंड आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी परिसर घेतले.
या कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र. कुलगुरू लक्ष्मीकांत दामा, राज्य शासनाचे भाषा अधिकारी मा. संजय पवार, प्रभारी कुलसचिव डॉ.अतुल लकडे, विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय टेंभुर्णी चे प्राचार्य व भाषाभ्यासक डॉ. महेंद्र कदम आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच संकुलातील सर्व शिक्षक व विद्यार्थी, भाषाभ्यासक व बहुसंख्येने श्रोते वर्ग उपस्थित होता.
























