कंधार/प्रतिनिधी
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व आमदार डॉ.भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ लोहा/कंधार तालुक्यातील प्रत्येक गाव,वाडी,तांडा व शहरातील वयोवृद्ध व्यक्तींच्या डोळ्याचे शिबिर आयोजित करुन मोफत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेऊन अंधमुक्तीचा संकल्प केला. व ३ हजार लोकांच्या डोळ्यांची यशस्वी शस्त्रक्रिया पहिला टप्यात पार पडली. प्रत्येक शिबीरासाठी गावागावात प्रा.पुरुषोत्तम धोंडगे व त्यांची पत्नी मनिषाताई धोंडगे उपस्थित होत्या. पुरुषोत्तम धोंडगे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकशाही न्युज चॅनलच्यावतीने “आरोग्यरत्न सन्मान २०२४” हा पुरस्कार मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते दि.१४ ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात आला.
प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्यावतीने कोरोना काळात कंधार व लोहा तालुक्यातील सरकारी आणि खासगी डॉक्टरांना पिपीई किटची सुविधा उपलब्ध करून दिली. कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी ‘भाऊचा डब्बा ‘ हा उपक्रम सुरू करून सामाजिक बांधिलकी जोपासली. गेल्या तीन वर्षापासून भाऊचा डब्बा हा उपक्रम अविरत सुरू आहे.कोरोना आजाराने जीव गमावलेल्यांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली.कंधार व लोहा तालुक्यातील ३ हजार वयोवृद्धावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली. या सर्व बाबींची दखल घेऊन लोकशाही न्यूज चॅनलच्या वतीने प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांना दिलेल्या पुरस्कारामुळे कंधार व लोहा तालुक्यात त्यांचे कौतूक होत आहे.