करमाळा – युवा समाजसेवक प्रा. गणेश करे-पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या सन्मानार्थ भारतीय डाक विभागाने नुकतेच एक टपाल तिकीट प्रसिद्ध केले आहे.
वसंत महोत्सव 2025 चे औचित्य साधत या टपाल तिकीटाचे अनावरण भारताचे प्रसिध्द संशोधक व मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. अरिवंद देशमुख यांचे हस्ते, व अक्कलकोट स्वामी देवस्थानचे विश्वस्त भारतराव शिंदे-पाटील, डॉ. इंदिरा पाटील, डॉ. महेंद्र पाटील, अमित देशमुख, प्रा.बाळकृष्ण लावंड, राजकुमार दोशी, दिलीप तळेकर, व शेकडो शिक्षणप्रेमींच्या उपस्थितीत करमाळा येथे संपन्न झाले.
यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असलेले प्रा. गणेश करे- पाटील यांनी आपले अवघे जीवन समाजकार्यास समर्पित केलेले आहे. पूर्व राष्ट्रपतींचे विज्ञान सल्लागार असलेले श्रद्धेय्य स्व. वसंतराव दिवेकर यांच्या प्रेरणेने व सहकार्याने यशकल्याणी संस्था स्थापन केली. प्रा.करे-पाटील यांनी या संस्थेच्या माध्यमातून मागिल अकरा वर्षांहून अधिक काळ विविध समाज उपयोगी कामे अखंडित सुरू ठेवलेली आहेत व या कार्याची दखल भारतीय डाक विभागाने नुकतेच टपाल तिकीट प्रसिध्द केले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शैक्षणिक चळवळ गतीमान करण्यासाठी शिक्षक सक्षमीकरण शिबीरे व अभ्यास सहलींचे आयोजन, आदर्श शिक्षकांचा गौरव, विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळासह मार्गदर्शन, प्रोत्साहन, विविध स्पर्धा व पारितोषिके , विद्यार्थ्यांचा मानसिक व भावनिक विकास व्हावा यासाठी आपल्या व्याख्यानांतून समुपदेशन , विज्ञान विषयक दृष्टीकोन विकसित होण्यासाठी आयसर पूणे सारख्या विज्ञान संस्थेच्या सहकार्यातून विज्ञान कार्यशाळांचे यशस्वी आयोजन केले जाते. यापूर्वी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आयपीएस विश्वास नांगरे-पाटील,सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने, ग्लोबल टीचर रणजीत डिसले, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विक्रम अडसुळ , मुंबई उच्च न्यायालयाचे विधीज्ञ अविनाश गोखले अशा विविध क्षेत्रांत अनन्य मार्गांनी समाजाची सेवा करणाऱ्या या मान्यवरांच्या कार्याची दखल घेऊन टपाल तिकीट प्रसिद्ध केलेले आहे.
आता यामधे प्रा. गणेश करे-पाटील यांच्या नावाचा समावेश झाल्याने पुणे जिल्हा व करमाळा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणप्रेमी नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतं आहे
युवा समाजसेवक प्रा. गणेश करे-पाटील यांचे समाजकार्य दिशादर्शक व नेत्रदिपक आहे. भारतीय टपाल विभाग समाजासाठी सर्वोतोपरी योगदान देणाऱ्या महान व्यक्तींच्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन अशा व्यक्तींबद्दल आदर व्यक्त करते.
अमित देशमुख,
उपविभागिय डाक निरिक्षक , कराड उपविभाग जि. सातारा.