*प्रा. उत्तमकुमार कांबळे यांनी जनतेशी साधला संवाद*
*प्रा.कांबळे यांच्या नावाला मतदासंघांतून चांगला प्रतिसाद*
देगलूर/प्रतिनीधी
आगामी विधासभा निवडणुकीच्या अनुषगाने देगलूर – बिलोली मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी तसेच भावीनी जनतेच्या भेटी गाठी घेण्यास सुरुवात केली आहे. प्रा. उत्तमकुमार कांबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जोपासात समाज उपयोगी अनेक उल्लेखनीय काम केले.कोरोना काळात अन्नधान्य वाटप असो की विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर असो यातुन आपली वेगळी भूमिका घेत त्यांनी जनमत तयार केले आहे.
लवकरच विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्याची शक्यता असून प्रा. उत्तमकुमार कांबळे मित्रमंडळाकडून जनतेशी संवाद साधत जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. देगलूर तालुक्यातील खानापूर, कावळगाव, करडखेड, मरखेल, क्यादरकुंटा, हाणेगाव, होट्टल, काठेवाडी, कुशावाडी आदी गावांत जाऊन प्रा. उत्तमकुमार कांबळे यांनी जनतेशी संवाद साधला.
देगलूर बिलोली मतदासंघांत उच्चशिक्षित उमेदवार असावा अशी इच्छा देखील या वेळी जनतेने केली. त्याबरोबर प्रा कांबळे यांचा माजी विद्यार्थ्यांसोबत दाडगा संपर्क असुन येत्या निवडणुकित त्यांना मोठा फायदा होणार असल्याची सुद्धा चर्चा होत आहे. येत्या निवडणुकीत कोणत पक्ष त्यांना उमेदवारी देईल त्यांचं सोन नक्कीच प्रा.उत्तमकुमार करणार असल्याची सुद्धा चर्चा मतदारसंघात होताना दिसून येतं आहे. एवढेच नसून शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तसेच जनतेतून सुद्धा प्रा कांबळे चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र स्पष्ठ दिसून आले.