अक्कलकोट : विश्व हिंदू परिषदेतर्फे अक्कलकोट येथे विशेष संपर्क विभागाचा प्रांत अभ्यास वर्ग संपन्न झाला. पश्चिम महाराष्ट्र प्रांतामधील 25 जिल्ह्यांमधून विहिंप कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी होते. विहिंपचे केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्ते अंबरिशजी, विशेष संपर्क विभागाचे दक्षिण भारत झोन प्रमुख संजय ढवळीकर, प्रांत मंत्री किशोर चव्हाण,सहमंत्री अॅड.सतीश गोरडे आणि श्रीकांत पोतनीस आणि तालुका संघचालक रवी जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
अक्कलकोट वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरच्या कै.कल्याणराव इंगळे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अभ्यास वर्गाचे उद्घाटन श्रीराम आणि भारतमाता प्रतिमचे पूजन अंबरिशजी(नवी दिल्ली), संजय ढवळीकर (ठाणे), विशेष संपर्क विभागाचे प्रांत प्रमुख तथा उद्योगपती श्रीकांत पोतनीस (कोल्हापूर), प्रांत :धर्माचार्य संपर्क प्रमुख नागनाथ बोंगरगे, विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे यांच्या हस्ते करून झाले. संजय ढवळीकर यांनी अभ्यास वर्गाची प्रस्तावना सांगितली तसेच अभ्यास वर्गाचे महत्व अधोरेखित केले. अंबरिश जी यांनी देशभरात विशेष संपर्क विभागाच्या माध्यमातून समाजातील प्रतिष्ठित वर्ग यांचा संपर्क करून विहिंपच्या कार्याची माहिती आणि जागरण याविषयी प्रबोधन केले. यासाठी उद्योगपती, व्यापारी, कारखानदार, प्रशासकीय अधिकारी, राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, डॉक्टर, वकील, सीए, इंजिनिअर, संशोधक, शास्त्रज्ञ, प्राध्यापक यांच्या श्रेणीमधून संपर्क गटाची रचना करण्याविषयी मार्गदर्शन केले.
अभ्यासवर्गाचे सूत्रसंचालन विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे, परिपाठी जिल्हामंत्री संजयकुमार जमादार यांनी केले. याप्रसंगी प्रमुख मान्यवर उद्योजक तथा कोषाध्यक्ष हितेष माधू, जनता बँकेचे संचालक पुरुषोत्तम उडता, सहमंत्री बापू कदम, विष्णू जगताप, बजरंग दल सहसंयोजक अभय कुलथे, समरसता आयाम प्रमुख चंद्रकांत कुलकर्णी, विशेष संपर्क विभाग प्रमुख प्रवीण जिल्हा, तालुका सहकार्यवाह संतोष वगाले, सायबण्णा सोनकांबळे, अनिल कोळी, प्रखंड मंत्री बालाजी राजपूत, कृष्णा देशपांडे, प्रखंड बजरंग दल संयोजक मदन राठोड, गोविंद शिंदेे, स्वामी यांनी अभ्यास वर्ग यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

















