वैराग – सोलापूर जिल्ह्यातील मागासवर्गीय वसतिगृह अधिक्षक व संस्थाचालक यांना भारतीय जनता पार्टी (अनु. जाती मोर्चा ) चे माजी जिल्हाध्यक्ष अमोल डोळसे यांनी एका लेखी पत्रकाद्वारे जाहीर आवाहन केले आहे, डोळसे यांनी केलेल्या आवाहानात म्हटले आहे कि, मी सोलापूर जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्तीग्राहबद्दल माहिती अधिकारा खाली माहिती मागितली होती तसें तक्रार अर्ज हि दिला होता.
संबंधित माहिती अधिकार अर्जाची प्रथम आपिलीय अधिकारी यांनी सुनावणी घेऊन मला माहिती उपलब्ध करून दिली, तसेच माझ्या तक्रार अर्जाचे हि निरसन केले आहे, संबंधित सर्व वसतिगृहा बद्दल माझी काही तक्रार नसलेचे मी समाजकल्याण विभागा ला लिहून दिले आहे.
तरी सुद्धा समाजकल्याण विभागातील वसतिगृह कर्मचारी हे संबंधित वसतिगृह अधिक्षक व संस्थाचालक यांना माझ्या तक्रार अर्जाचा संदर्भ घेऊन पैसे मागत आहेत, तरी कुठल्याही वसतिगृह अधिक्षक व संस्थाचालकांनी संबंधित कर्मचारी यांच्याशी देवाण घेवाण करू नये असे जाहीर आवाहन डोळसे यांनी केले आहे



























