वळसंग : दि.०७ जानेवारी रोजी वळसंग पोलीस ठाणे हद्दीत पोलीस रेझिंग डे निमित्त शंकरलिंग प्रशाला, वळसंग, श्री रामलिंगेश्वर प्रशाला, तीर्थ तसेच होटगी येथील शाळा येथे विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सायबर गुन्हे प्रतिबंध, वाहतूक नियम व वाहतूक व्यवस्थापन, नवीन फौजदारी कायद्यांची माहिती, तसेच महिला व बालकांशी संबंधित कायदे याबाबत सविस्तर व सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले.
सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, तसेच कोणत्याही संशयास्पद बाबी आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, अल्पवयीन वाहनचालकांचे धोके याबाबतही विद्यार्थ्यांना सखोल माहिती देण्यात आली.तसेच महिला विषयक कायदे, बालक संरक्षण कायदे आणि आपत्कालीन परिस्थितीत डायल 112 हेल्पलाईन चा वापर कसा करावा याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
याकरिता वळसंग पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार हजर होते.


















