लोहारा – उमरगा लोहारा मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ
शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांची लोहारा तालुक्यातील जेवळी येथे भव्य जाहीर सभा घेण्यात आली.या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही विकास करून दाखवू.”
शेतकरी, मजूर आणि युवकांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी स्पष्ट आश्वासन दिले की—
- युवकांच्या हाताला काम देण्यासाठी लोहारा तालुक्यात एम.आय.डी.सी. उभारली जाईल
- स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील
- शेतकरी आणि मजुरांच्या विकासासाठी ठोस निर्णय घेतले जातील
- लाडक्या बहिणीची योजना बंद होणार नाही योजनेअंतर्गत वेतनात योग्य वेळी वाढ करण्यात येईल
लोहारा–उमरगा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत,
महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या जाहीर सभेला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, संपर्क प्रसुख राजन साळवी, , माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) पक्षाचे प्रदेश सचिव सुरेश बिराजदार, भगवान देवकाते, सुरज साळुंके, अजित पिंगळे, जितेंद्र शिंदे, उमरगा नगराध्यक्ष किरण गायकवाड, लोहारा नगराध्यक्षा वैशाली खराडे, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, सुनील साळुंके, योगेश केदार, युवा सेना मराठवाडा निरीक्षक आकांक्षा चौगुले, बळीराम सुरवसे, जगन पाटील, अमीन सुंबेकर, यांच्यासह उमरगा व लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गणातील
तसेच महायुतीचे स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती



















