पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव व आसपासच्या भागात वारंवार घरफोड्या तसेच चोऱ्यांचा ताबडतोब तपास व्हावा यासाठी पिलीव येथील नागरी आघाडीच्या वतीने पोलीस प्रशासना विरोधात जनआक्रोश मोर्चा आज शुक्रवार दिनांक 31 आकटोंबर रोजी सकाळी दहा वाजता काढण्यात आला.ह्या जनआक्रोश मोर्चाची सुरुवात पिलीव येथील हनुमान मंदिरापासून करुन बसस्थानकावरील पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
या निवेदनात पिलीव व आसपासच्या परिसरात वारंवार घरफोड्या तसेच मोटारसायकली, सोने ,नाणे ,शेळ्या, मेंढ्या यासारख्या अनेक चोऱ्या झाल्या आहेत. पण पोलीस प्रशासनाकडून एकाही चोरीचा तपास लागलेला नाही.यासाठी पोलीस प्रशासनाने ताबडतोब पावले उचलावीत राञी गस्त वाढवावी,पेट्रोलींग करावे,पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, पोलीस व्हॅनची सोय करावी आपण ताबडतोब या बाबीची अंमलबजावणी करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरी आघाडीचयावतीने पोलीस प्रशासनाला देण्यात आला.
यावेळी नागरी आघाडी चे अध्यक्ष आरिफखान पठाण, माजी सरपंच अमोल मदने,उमेशभाऊ सरवदे,माजी सरपंच संग्राम पाटील, राजेंद्र जामदार, संतोष शेंडगे ,कल्याण जावळे,गोविंद भैस, कुमार भैस, विजय पिसे,रुषीकेश मदने, जिवन गोरे,दादासाहेब वगरे,दामोदर लोखंडे,प्रकाश तावरे,वैभव पिसे,दत्तात्रय भैस, कुमार लोखंडे,श्यामराव गलांडे,निलेश झेंडे यासह नागरी आघाडीचे अनेक पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले होते .यावेळेस आरिफखान पठाण, अमोल मदने,रुषीकेश मदने,संतोष शेंडगे सर,राजेंद्र जामदार, विजय पिसे,सुजित सातपुते यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.सदरचे निवेदन पोलीस हवालदार स्वरुप शिंदे व धनाजी झगडे यांनी स्वीकारले.
पिलीव येथील नागरी आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चाचे निवेदन देताना आरिफखान पठाण, अमोल मदने,उमेशभाऊ सरवदे, संग्राम पाटील, व इतर मान्यवर.















