सोलापूर – बुधवारी दुपारच्या वेळेस विडी घरकुल प्रगती चौक गोविंदराज नगरच्या एका मोकळ्या जागेत असलेल्या 30फूट खोल कुपनलिकेत दहा पंधरा दिवसाचं श्वानाचे पिल्लू पडल्याची माहिती या भागातील नागरिकांना समजली. तब्बल तीन तास अग्निशमन, अॅनिमल वेल्फेअर पदाधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न करत अखेर त्या श्वानाच्या पिलाला बाहेर काढले.
प्रथम दोरीला फोकस लाईट असलेला दिवा आत सोडण्यात आला. अंदाज घेऊन दोरीने, काठीने, लोखंडी सळई, बायडिंग तार आत टाकून काढण्याचा प्रयत्न झाला पण पिल्लू पर्यंत पोहोचताच येईना. स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाचे गौतम आव्हाड यांच्याशी संपर्क साधला. तात्काळ घटनास्थळी आपले सहकारी केंद्र अधिकारी रावसाहेब सलगर यांच्यासमवेत पोहोचले. याठिकाणी त्यांनीही या 30 फूट खोल बोअरवेलमध्ये अडकलेल्या श्वानाचे पिल्लूला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. पाऊणतासाचे परिश्रम चालू असतानाच राहत अॅनिमल वेल्फेअर असोसिएशनशी संपर्क साधून त्यांनाही माहिती दिली. अग्निशामक दला आणि राहत अॅनिमल वेल्फेअर असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश उपरेत, अजित मोटे हे ही आले. दोघांनीही एकमेकांच्या सहकार्याने या 30 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या छोट्या श्वानाच्या पिल्लूला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्नाला सुरूवात केली.

३० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या छोट्या श्वानाच्या पिल्लूला सुखरूप बाहेर काढण्यात अखेर यश मिळाला यावेळी नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. तीन तासांहून अधिक काळ या बोअरवेलमध्ये अडकलेले पिल्लूला काही जखमा झाल्या होत्या त्यावर डॉ नरेश उपरेती आणि अॅनिमल वेल्फेअर असोसिएशनचे सहाय्यक अजित मोटे यांनी औषधोपचार करून त्या पिल्लूला त्यांच्या मातेकडे सोडून दिलं.

या निष्पाप जीवाला वाचविण्यासाठी उमेश गायकवाड, दत्तात्रय वंगा, दत्तात्रय म्याडम, अक्षय चन्नापट्टण, रवि बत्तुल, कृष्णाहरी कस्सा यांनी तब्बल तीन तास प्रयत्न केले. बाहेर आल्यानंतर या पिलाला गरम पाण्याने आंघोळ घालण्यात आला, त्यांची टाॅवेलने स्वच्छ करण्यात आले आणि दुध, बिस्कीट नागरिकांनी देत एका मुक्या जीवाचे प्राण वाचविले.


















