सोलापूर : WCAS चे सदस्य शिवानंद हिरेमठ आणि सचिन पाटील होटगी तलाव परिसरात पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफी करण्यासाठी गेले असता. तलावात एकाच ठिकाणी जांभळी पाणकोंबडी हतबल होऊन थांबलेली दिसली. जवळपास अर्धा तास पक्षी निरीक्षण करता असताना हिरेमठ सरांचा लक्ष पाणकोंबडी वर गेल्यावर अचानक तो उडण्याचा प्रयत्न करत असलेला दिसला. परंतु त्याची धडपड पाहिल्यानंतर तो जाळीत अडकला असेल हे लक्षात आल्यावर सचिन पाटील यांना कल्पना देऊन दोघांनी तातडीने तलावात उतरले. जवळ जाऊन पहिल्यानंतर मासे पकडण्याच्या हुकमध्ये पंखाची एक बाजू अडकलेली दिसली. शिवानंद हिरेमठ यांच्या सूचनेनुसार सचिन पाटील यांनी त्याची सुखरूप सुटका करून निसर्गात मुक्त करण्यात आले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















