Wednesday, March 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विरोधीपक्ष नेता की अराजक प्रणेता

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 2, 2024
in political
0
विरोधीपक्ष नेता की अराजक प्रणेता
0
SHARES
70
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सध्या देशातले राजकीय आणि सामाजिक वातावरण वेगाने रसातळाला चालले आहे हे लक्षण चांगले नाही. या गोष्टीचा वारंवार प्रत्यय येत आहे. देशाची प्रतिमा मलीन करणे आणि देशात यादवी निर्माण व्हावी या हेतूने देशातला विरोधी पक्ष कार्यरत झाला आहे याची साक्ष सोमवार, १ जुलै २०२४ या दिवशी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संसदेतील भाषणाने दिली आहे.

राहुल गांधींचे संसदेतील भाषण देशात अराजक निर्माण व्हावे आणि देशातील शांतता सुव्यवस्था नष्ट व्हावी याच हेतूने केलेले भाषण आहे. असे निश्चितपणे सांगता येते. संसदेच्या सभागृहातले त्यांचे हे भाषण म्हणजे नाक्यावरच्या चांडाळचौकडी समोर असभ्यतेने आणि बेदरकारपणे केलेली बकबक आहे. एकंदरीत राहुल गांधींचे भाषण, त्यांची देहबोली त्यांचे वर्तन सारेच सभागृहाची मानहानी करणारे आहे. अशा प्रकारचा विरोधी पक्षनेता जगाच्या पाठीवर कुठेही आढळणे शक्य नाही.

घटनेने जरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असले तरी त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला काही मर्यादा आहेत. त्या सर्व मर्यादांचे उल्लंघन राहुल गांधींनी करुन घटनेलाही लाथाडले आहे.

सामान्यपणे सत्ताधारी पक्षावर आरोप प्रत्यारोप करताना विरोधी पक्षनेता अत्यंत जबाबदारीने बोलत असतो. तसेच त्यांनी केलेल्या आरोपात कसे तथ्य आहे ते तो आपल्याकडील माहितीचे दाखले देऊन आपले म्हणणे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. काल राहुल गांधींनी यापैकी कोणतीही गोष्ट केली नाही.

राहुल गांधींनी केलेले सारे आरोप तथ्यहीन आहेत. सैन्य दलातील अग्निवीरांना चिथावणी देऊन बंड करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा त्यांचा मानस त्यांच्या भाषणातून निदर्शनास येत होता. त्यांचे या विषयावरील भाषण म्हणजे सैन्य दलात फूट पाडून देशात आराजक निर्माण व्हावे हा आहे हे स्पष्ट होते.

संरक्षण मंत्री राहुल गांधींनी केलेल्या आरोपाचे खंडन करत असतानाही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून कोणतेही दाखले न देता आपलेच म्हणणे कसे खरे आहे हे सांगण्याचा त्यांचा आततायीपणा सातत्याने चालू होता. संसदेतील सभ्यतेच्या सर्व मर्यादांचे उल्लंघन राहुल गांधी वारंवार करत असल्याचे आढळून येत होते.

देशातला प्रत्येक हिंदू हा हिंसक आहे आणि सतत हिंसा करत असतो. असत्य कथन करत असतो असा भयंकर आणि तथ्यहीन आरोप हिंदू समाजावर राहुल गांधींनी केला आहे. एवढेच नव्हे तर भगवान शंकरांची प्रतिमा संसदेत दाखवून त्यांनी हिंदूंच्या श्रद्धास्थानावरही आघात केले आहेत. त्यांचे हे भाषण म्हणजे हेतूत: हिंदू समाजाला अपमानित करणे एवढेच नसून हिंदू समाज अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कसा विरोध करतो आहे अशी ओरड करण्यासाठी राहुल गांधी पुन्हा गरळ ओकण्यास मोकळे आहेत. त्यांच्या या संसदेतील भाषणा मागचा हेतू देशातले वातावरण बिघडावे हाच आहे.

सध्या देशातल्या विविध भागात मुसलमान समाजाकडून होत असलेला हिंसाचार राहुल गांधींना दिसत नाही. पीडित हिंदूच्या करुण किंकाळ्या त्यांच्या कानावर पडत नाहीत. त्यांच्या दृष्टीला सनदशीर मार्गाने आपल्यावरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करणारा हिंदू समाज हिंसक वाटतो. हा राहुल गांधींचा दृष्टी दोष नसून विकार दोष आहे.

त्यांच्या भाषणात देशातल्या विविध स्तरातील नागरिकांवर विद्यमान सरकारकडून अन्याय होत आहे. त्या अन्यायाविरोधात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी विद्यमान सरकारवर केलेले आरोप हे तथ्यहीन आहेत. कोणताही आरोप करताना ते आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केलेला आढळत नाही. तर केलेला आरोप हा सत्य आहे त्यासाठी पुरावे देण्याची आवश्यकता नाही. अशी बेदरकार भाषा आणि अविर्भाव त्यांच्या भाषणामागचा हेतू शुद्ध नसल्याचे स्पष्ट करतो. संबंधित खात्यातील मंत्र्यांनी दिलेले स्पष्टीकरण स्वीकारण्याचे नव्हे तर ऐकण्याचेही सौजन्य राहुल गांधींनी दाखवले नाही. त्यांचे हे वर्तन म्हणजे संसदेतील कामकाज योग्य प्रकारे होऊ नये म्हणून केलेला प्रयत्न आहे. अशाप्रकारे संसदेच्या कामकाजात व्यत्य निर्माण करून राष्ट्राची आर्थिक हानी काळाचा अपव्यय राहुल गांधी करत आहेत. अशाप्रकारे वर्तन करणाऱ्या संसदेच्या सभासदाला संसदेत बसण्याचा नैतिक अधिकार नाही.

संसदेतील कामकाज सुरळीत आणि संसदेच्या नियमावलीत दिल्याप्रमाणे पार पाडणे हे जेवढे सत्ताधारी पक्षाचे दायित्व आहे तेवढेच विरोधी पक्ष नेत्याचे दायित्व आहे. राहुल गांधी यांनी संसदेच्या या नियमावलीचा आणि मार्गदर्शन तत्त्वाचा आदर राखला आहे असे म्हणता येत नाही. यावरून आपल्याला असे नक्की म्हणता येते की राहुल गांधी हे विरोधी पक्षनेता या पदासाठी अपात्र आहेत कारण त्यांनी देशहिताचा विचार करून केलेले भाषण नाही. त्यांचे भाषण हे विरोधी पक्ष नेत्याचे नसून एका अराजक प्रणेत्याचे आहे, हे स्पष्ट होते.

Post Views: 16
Previous Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन

Next Post

मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ अभ्यंकर 4 हजार 83 मते मिळवून विजयी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ अभ्यंकर 4 हजार 83 मते मिळवून विजयी

मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ अभ्यंकर 4 हजार 83 मते मिळवून विजयी

ताज्या बातम्या

बदनापूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास प्रारंभ. #public #solapurnews

March 4, 2026

बदनापूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास प्रारंभ. #public #viral

March 4, 2026

संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पवार यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्राप्त.

March 4, 2026

आमदार भास्कर जाधव आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात विधान भवनात वादावादी..

March 4, 2026

गोरक्षक सुधीर बहिरवडे आणि त्यांचे सहकारी व कार्यकर्त्यांनी माकपचे आंदोलन बंद पाडल्याची घटना घडली..

March 4, 2026

इराणवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी माकप च्या वतीने निदर्शने काढण्यात आली.. #public #viral

March 4, 2026

जिंतूर मध्ये उत्साहात होळी साजरा#public #marathinews #solapurnews #viral #maharashtranews #festival

March 4, 2026

राजर्षी शाहू महाविद्यालयात विचार मंथन कार्यक्रम संपन्न. #public #viral

March 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0715183

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697