कोकण रेल्वे कॉर्पोरेशन ही स्वतंत्र कंपनी असून या कंपनीचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे विचाराधिन आहे. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करताना कोकण रेल्वेचे रेल्वे झोन आणि साऊथ वेस्ट झोनमध्ये विभागणी करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यात बदल करून कोणत्याही अन्य झोनमध्ये कोकण रेल्वेची विभगणी न करता कोकण रेल्वेचा नवीन रेल्वे झोन तयार करावा. देशात रेल्वेचे 16 झोन आहेत. कोकण रेल्वेचा नविन झोन तयार केल्यास देशात रेल्वेचे 17 झोन होतील. कोकण रेल्वेचा नविन रेल्वे झोन तयार करण्यासाठी आपण रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊ, असे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास यांनी दिले.
के.आर.सी.एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष सुभाष माळगी, कोकण रेल्वे एस.सी.एस.टी असोसिएशन अध्यक्ष नारायणदास अहिरवार,ओबीसी असोसिएशनचे रामनाथ पाटील, रिपाइं नेते सुनिल गमरे, मोहन खेडेकर आदींच्या शिष्टमंडळाने आठवले यांची भेट घेऊन कोकण रेल्वेबाबत निवेदन दिले. कोकण रेल्वेचा नविन रेल्वे झोन तयार करावा, अशी मागणी कोकण रेल्वेच्या कामगारांच्या शिष्टमंडळाने आठवले यांच्याकडे केली. कोकण रेल्वेचा नविन रेल्वे झोन तयार करण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची आपण लवकरच भेट घेऊ, असे आश्वासन रामदास आठवले यांनी शिष्टमंडळाला दिली.