देगलूर : अडत व्यापारी शिक्षण संस्था, देगलूर संचलित श्री शिवाजी इंग्लिश स्कूल, देगलूर येथे ‘रंग तरंग–2026’ हे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी शाळेच्या प्रांगणात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर हे होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून पोलीस निरीक्षक मारुती मुंडे व मुख्याधिकारी निलम कांबळे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष जनार्दन चिद्रावार, देवेंद्र मोतेवार, विजय उनग्रतवार, चंद्रकांत नारलावार, विश्वनाथराव कोंडेकर (माजी मुख्याधिकारी, जिल्हा परिषद नांदेड), हमीद दौलताबादी (शिक्षण विस्ताराधिकारी, देगलूर), वसंत नरवडे ( सेवानिवृत्त नायब तहसीलदार, देगलूर), दै. तरुण भारत प्रतिनिधी मिलिंद वाघमारे, धनाजी देशमुख, अमित शिंदे, संतोष चिद्रावार, काजी तोहीद, अब्दुल मोबीन आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. यामध्ये देशभक्ती, सोलो, लावणी, महापुरुषांच्या जीवनावर आधारित गिते, वैयक्तिक व सामूहिक नृत्य, भाषण व नाटक आदीं कलाविष्कारांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक नरवाडे व्ही. व्ही. (करडखेडकर) यांनी केले. विशेष बाब म्हणजे या स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थ्यांनीच अत्यंत आत्मविश्वासाने व प्रभावीपणे केले. यामध्ये देवदत्त पाटील, अदिती काठेवाडे, श्रद्धा उनग्रतवार, माणिक नरवडे, मायरा शर्मिन, शिवप्रसाद पाटील, आरुषी केंचे, शिवप्रसाद झरीकर, संस्कृती चिद्रावार, शौर्य देशमुख, अब्दुल अरमान, कु. इन्शा अब्दुल आदी विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोंडावार राकेश, मिसाळे तानाजी, सुकनाळे तानाजी, कृष्णा पाटील, गुगलवार संतोष, कीर्तीवार नागनाथ, नागभूषणम सर, प्रवीण सर, अमर पाटील सर, जोशी मॅडम, खमितकर मॅडम, पदमवार मॅडम, उमरा मॅडम, कल्याणी मॅडम, मंजुषा मॅडम, सुवर्णा मॅडम, रेखाताई, ललिता ताई तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे रंगतदार सादरीकरण, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे ‘रंग तरंग–2026’ हे स्नेहसंमेलन अविस्मरणीय ठरले.

























