नांदेड – मुदखेड तालुक्यातील मौजे पिंपळकौठा (मगरे)येथे दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या सामूहिक पाठण समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा धार्मिक सोहळा अत्यंत उत्साहाच्या आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत प्रतिष्ठित आणि धार्मिक पद्धतीने करण्यात आली. सर्वप्रथम गावातील प्रमुख मार्गावरून पूज्य भन्ते यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली.
या समारोहासाठी छत्रपती संभाजीनगर येथील पूज्य भंन्ते ज्ञानरक्षित महाथेरो, नांदेड येथील पूज्य भंते शीलरत्न थेरो, पूज्य भंते संघपाल थेरो, पूज्य भंन्ते गगनबोधी थेरो, आणि भंते आनंद शील यांची विशेष उपस्थिती लाभली होती. उपस्थित भन्तेजींच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
सर्व उपस्थितांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केले आणि ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या महान ग्रंथाच्या सामुदायिक पाठाचा समारोप करण्यात आला.
या धार्मिक कार्यक्रमानंतर उपस्थित गावकऱ्यांसाठी महाभोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी ग्रंथ वाचक संतोष भगवान वंजारे आणि सूचक मनोज मारोती पवळे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती दर्शविलेल्या मान्यवरांमध्ये एल. एल. गायकवाड, भा. बौ. म. (भारतीय बौद्ध महासभा) तेलंगानाचे उपाध्यक्ष भुजंगराव गायकवाड, समाजसेवक पांडुरंग जाधव, सुनील चौदंते, सूर्यकांत चौदंते, राहुल अप्पा चौदंते, सुभाष चौदंते, ग्रामसेवक सोनटक्के, रामराव शंकरराव पाटील मगरे, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव मेंडेवाड, शिवाजी बल्फेवाड, शिवाजी शेटकर सर,वसरणी येथील अमोल अशोक गजाभरे, अनुरथ कसबे, भा.बौ.म. मुदखेड अध्यक्ष प्रशांत निखाते, गोविंद गायकवाड, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सिध्दार्थ चौदंते,पत्रकार साहेबराव हौसरे आणि धम्मदाता कांबळे यांचा समावेश होता.
हा भव्य समारोप व धम्मदेसना कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच देविदास जोंधळे, पोलिस बालाजी वाघमारे, प्रभाकर थोरात, रमेश जोंधळे, विजय दवणे, साहेबराव हौसरे (पोलिस), गंगाधर वंजारे,बाळकृष्ण चौदंते, संदीपान जोंधळे, केरबा जोंधळे,उत्तम वंजारे,व्यंकटी दवणे, साईनाथ दवणे, साहेबराव वंजारे ,मनोज वंजारे, हर्षवर्धन कांबळे,यासह वाय.बी.एस. मित्र मंडळ व समस्त बौद्ध बांधव तसेच गावकरी मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले.




















