माहूर – महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेले, श्रीक्षेत्र माहूर गड संस्थान निर्मित ‘माहूर गडाची माय रेणुका’ हा महाकवी संत विष्णुदासांच्या रसाळ रचनेवर आधारित संगीत महोत्सव कार्यक्रम मंगळवार दि.२७ जानेवारी रोजी शंकरराव चव्हाण सभागृह, नांदेड येथे सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे.
याच महोत्सवात जगविख्यात दंडक्रम वेदपारायण करणारे आपल्या भारताचे व विशेषतः महाराष्ट्राचे नाव उंचावणारे, आजच्या युवापीढीसाठी आदर्श असणारे १९ वर्षीय वेदमूर्ती दंडक्रम विक्रमादित्य ‘चि. देवव्रत महेशजी रेखे’ यांचा भव्य सत्कारसमारोह देखील श्री रेणुकादेवी संस्थान श्रीक्षेत्र माहूर गड तर्फे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी IAS राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड हे राहणार आहेत.तर उद्घाटक म्हणून किरण कुलकर्णी IAS मराठी भाषा सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई हे उपस्थित राहणार आहेत. तसेच अबिनाश कुमार IPS जिल्हा पोलिस अधीक्षक, नांदेड,मेघना कावली IAS मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. नांदेड,महेशकुमार डोईफोडेआयुक्त नांदेड वाघाळा महानगरपालिका नांदेड,व शंतनु डोईफोडे संपादक दै. प्रजावाणी नांदेड या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
माहूर गडाची माय रेणुका हा संगीत महोत्सवाचा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला असून, कार्यक्रम ठरलेल्या वेळेवर सुरू होणार असल्याने रसिकांनी याची नोंद घेऊन वेळेपूर्वीच कार्यक्रम स्थळी पोहोचावे ,असे आवाहन
सुनील वेदपाठक प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष रेणुका देवी संस्थान श्रीक्षेत्र माहूर गड जिल्हा नांदेड,जेनित चंद्रा दोन्तुला सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट, किरण भोंडवे उपविभागीय पोलीस अधिकारी, माहूर आणि समस्त विश्वस्त मंडळ श्रीक्षेत्र माहूर गड जि. नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.

























