सोलापूर : संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर शहरातील सिटी बस सेवा सुरु करण्यासाठी महापालिका जनता दरबारात अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांना निवेदन देण्यात आले.
मागील बऱ्याच वर्षांपासून सोलापूर शहरात बऱ्याच ठिकाणी सिटी बसेस बंद आहेत. सिटी बसेस बंद असल्यामुळे रिक्षाने प्रवास करावा लागतो व रिक्षावाले सिटी बसच्या तुलनेत दुप्पट तिप्पट प्रवासपैसे घेतात. सिटी बस हा सर्वसामान्यांसाठी खूप मोठा आधार आहे परंतु मागील बऱ्याच वर्षांपासून शहरात बऱ्याच ठिकाणी सिटी बस धावत नाहीत. यामुळे रिक्षावाले खूप मनमानी करतात. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतात. विविध समस्यांमुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहरांमध्ये सर्व ठिकाणच्या सिटी बसेस सुरू कराव्यात.
याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, महानगर प्रमुख शिरीष जगदाळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनल दास, ॲड.गणेश कदम ,महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष जयश्री जाधव, शहराध्यक्ष मनीषा कोळी, जिल्हा सचिव संजीवनी सलबत्ते, जिल्हा उपाध्यक्ष सुनिता घंटे, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, उद्योग आघाडी शहर अध्यक्ष संतोष सुरवसे, शहर व जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे, शहर कार्याध्यक्ष सतीश वावरे, सुनंदा सूर्यवंशी, सुनिता कारंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

























