सांगोला – श्री हनुमान सार्वजनिक वाचनालय वासुद (ता.सांगोला) येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्देशिका वाचन करून ग्रंथपाल अनिकेत शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत गायन झाले. प्रास्ताविकात संतोष मोरे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त महत्वपूर्ण माहिती सांगितली.
याप्रसंगी वासुदचे सरपंच संभाजी चव्हाण, उपसरपंच अनिल केदार, वाचनालयाचे संचालक मोहन साळुंखे, नानासाहेब केदार, मेजर सुखदेव सपताळ, अरुण केदार, रविकांत मराळ, तानाजी पाटील, कॅ.दत्तात्रय केदार, माजी सरपंच रमेश गोडसे, चंद्रकांत केदार, अंबादास पवार, आदलिंगे, नितीन केदार, तानाजी केदार, सरदार केदार, हनुमान विद्यालयाचे सर्व स्टाफ, विद्यार्थी, पालक, उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

























