वेळापूर – शिवशंभू मंगल कार्यालय, येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडली. सर्वप्रथम पालखी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास सरवदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या बैठकीस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. बैठकीचे अध्यक्षस्थान सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी भूषविले.
बैठकीमध्ये आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने सखोल चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची सद्यस्थिती, संघटनात्मक बांधणी, तसेच पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेल्या रणनीतीवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी राज्य सचिव सुनील सर्वगोड ,राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार, जितेंद्र बनसोडे, किरण धाईंजे, आप्पासो जाधव, एन.के. साळवे, बाळासाहेब कसबे, चंद्रकांत वाघमारे, हनुमंत कसबे, नागनाथ ओहोळ, एस एम गायकवाड, कुमार भोसले, दामोदर साठे, शामसुंदर गायकवाड, तात्यासो काळे, अण्णा बनसोडे, विक्रम शेळके, बापूसो बनसोडे, विठ्ठल क्षिरसागर ,शामराव भोसले, तुकाराम बाबर, रमेश धाईंजे, आठवले सिद्धार्थ, बनसोडे भारत आठवले तालुकाध्यक्ष, नगरसेवक अविनाश मडीखांबे, खंडू सातपुते, दत्ता क्षीरसागर, मारुती वाघमारे, नानासो सोनवणे, रामजी गायकवाड, अशोक शिवशरण, नानासो गायकवाड, दयानंद बाबर, संयोजक माळशिरस तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे, यांच्या सह सोलापूर जिल्यातील राज्य पदाधिकारी,पश्चिम महाराष्ट्र,जिल्हा,युवा आघाडीचे पदाधिकारी,प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















