बार्शी – कत्तलसाठी अकलूजहून धाराशिवला नेणाऱ्या १३ गाई पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने पकडून पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. इर्शाद कमाल नदाफ, वय ३३ गांधी चौक, अकलूज, सर्फराज उर्फ शहानवाज गुलाम हुसेन कुरेशी, वय २७, रा व्यंकटनगर, अकलूज, मुज्जमील शाकीर शेख, वय २०, रा पंचवटी स्टॉप, अकलूज, सैफअली याकूब कुरेशी, वय २८, रा. कुरेशी गल्ली, अकलूज अशी दाखल आरोपीचे नावे आहेत.
अधिक माहिती अशी की, दि. २६ रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास मालवंडी चौकात एका आयशर टेम्पोमध्ये गाई कत्तलसाठी घेऊन जात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार फिर्यादी सुनील सरडे, कौलगे इत्यादी डायल ११२ ड्युटीवरील पोलिसांनी मालवंडी चौकात जाऊन आयशर टेम्पो क्रमांक एम एच ४५ ०९४७ हा टेम्पो अडवून तपासणी केली असता १३ गाई दाटीवाटीने भरुन त्या गाईची कोणतीही सोय नाही, वाहतूक परवानगी नाही, असे निदर्शनास आले आहे म्हणून पोलिसांनी वाहने व जनावरे असे एकूण ८ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन ही कारवाई केली आहे.




















