अक्कलकोट – सोलापुरातील नियोजित आय. टी. पार्क येथे पन्नास हजार लोकांना काम मिळणार आहे देशी विदेशी शेकडो श्रीमंत आय. टी. कंपन्यांना आपापले उद्योग उभारणीसाठी कमी किंमतीत भूखंड मिळणार आहे हे आनंद व समाधानाचा विषय आहे पण सोलापूर जिल्ह्याच्या मातीत जन्मलेल्याना या नियोजित आय टी पार्क मध्ये संधी मिळणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात I T शिक्षण घेऊन पुण्या मुंबईत काम करण्याऱ्या मध्यम वर्गीय सुशिक्षित तरुण मुलांना आणि नव उद्योजकाना सोलापुरातील नियोजित आय. टी. पार्क मध्ये दोन हजार चौरस मिटरचे 100 भूखंड राखीव ठेऊन मागणीनुसार संबधिताना कमी किंमतीत भूखंड देण्यात यावे अशी जोरदार मागणीचे लेखी निवेदन* स्वराज्य माहिती अधिकार संघटनेचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक यांच्या नेतृत्वाखाली *एका शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून राज्यांचे उद्योग मंत्री मुंबई व जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन दिल आहे . तसेच पुणे रोडवरील कार्यालयात एम. आय. डी. सी. चे सहसंचालक शिवाजी राठोड यांना निवेदन देण्यात आले आहे.*
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दिपक जी कांबळे, संस्थापक तथा राष्ट्रीय मुख्य महासचिव कमलेश शेवाळे, विश्वस्त तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ. धनश्रीताई उत्पात यांच्या सूचनेनुसार आणि सर्व विश्वस्त, सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत (दादा) वेदपाठक समवेत जिल्हा कार्याध्यक्ष सुनील पंडित, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्रकुमार रघोजी, जिल्हा सचिव सुधाकर शहाणे , जिल्हा सरचिटणीस दत्तगुरु वेदपाठक, जिल्हा सरचिटणीस दिपक कुरुलकर, जि. कार्य. सदस्य अमोल शहाणे, जि. कार्य. सदस्य मोडनिंब चे अमर शिंदे, जि. कार्य. सदस्य दिलीप क्षीरसागर, जि. कार्य. सदस्य संतोष पोतदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

























