बार्शी – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘सितारा महिला विकास संस्थे’च्यावतीने आयनॉक्स, कोरेगाव पार्क येथे आयोजित ‘सितारा आयकॉन’ या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात, पोलीस दलातील ‘सिंघम’ म्हणून निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांचा ओळखले जाणारे माजी पोलीस विशेष सन्मान करण्यात आला.
भाऊसाहेब आंधळकर यांनी आपल्या पोलीस कारकिर्दीत अनेक धाडसी कारवाया केल्या. विशेषतः ३५४ पिडीत मुलींना नरकयातनेतून सोडवून पुन्हा सन्मानाने त्यांच्या घरी पाठवण्याचे महान कार्य त्यांनी केले. तसेच गाजलेल्या रेव पाट्यांवरील धाडी आणि गुन्हेगारी विश्वात निर्माण केलेला त्यांचा दरारा यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने पोलीस दलातील ‘सिंघम’ ही पदवी मिळाली.
निवृत्तीनंतरही भाऊसाहेब आंधळकर यांचे कार्य थांबलेले नाही. सध्या ते अन्नछत्र, बचतगटांचे सक्षमीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैराग येथील भव्य पुतळ्याचे काम यासारख्या सामाजिक प्रकल्पांतून समाजाची सेवा करत आहेत. त्यांच्या या अष्टपैलू कामगिरीची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्यात अनेक दिग्गज उपस्थित होते, ज्यात प्रामुख्यानेः तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका, डॉ. दत्ता शिंदे, समाजसेवक या मान्यवरांचीही यावेळी उपस्थिती लाभली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना आंधळकर यांनी हा सन्मान त्यांच्या खाकी वर्दीचा आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा असल्याचे सांगितले.






















