मुदखेड – येथील शासकीय विश्रामग्रह येथे वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक संपन्न
नांदेड जिल्हा वंचित बहुजन आघाडी उत्तरची नुतन कार्यकारणी जाहीर होताच जिल्हाध्यक्ष प्रा. राज अटकोरे, जिल्हा महासचिव दिपक मगर,व जिल्हा उपाध्यक्ष के.एच.वने, बालाजी सुर्यतळे, अहंकारे, संघटक वाढवे, आणि सल्लागार प्रा. प्रल्हाद इंगोले यांनी मुदखेड तालुका व शहरातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कामकर्ते यांची आढावा बैठकीचे आयोजन दि. २३ जानेवारी रोजी शासकीय विश्रामग्रह येथे करण्यात आले होते.
या बैठकीत नुतन जिल्हाध्यक्ष प्रा. राज अटकोरे यांनी सांगीतले आहे कि वंचितच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन बुथ बांधनी करून वंचित बहुजन आघाडी पक्षाला मजबुत करून श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबुत करा.
या आढावा बैठकीचे औचित्य साधुन वंचितचे दादाराव किशनराव चौदंते यांच्या वतीने नांदेड जिल्हा वंचित बहुजन आघाडी उत्तरचे नुतन कार्यकरणी यांचे सत्कार स्वागत करण्यात आले.
यावेळी डि.जी. चौदंते, बाबुराव कोलते, राहुल चौदंते, अमोल चौदंते, शिलवंत डोंगरे, रोहन चौदंते, स्वयंदिप कांबळे, विकी गजभारे, रितीक चौदंते, सुभाष दुधंबे,
अमोल चौदंते, संतोष चौदंते, यांच्यासह आदि कार्यकर्ते यांची उपस्थीती होती.


























