*जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात वापरला सडलेला भाजीपाला..*
*मुख्याध्यापक रमेश सोसे यांचा प्रताप,*
तभा वृत्तसेवा
टेंभुर्णी/ विष्णु मगर
जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांच्या आहारात वापरण्यात येत असलेला भाजीपाला सडलेला असुन त्यात आळ्या असल्याचे पालकांच्या शाळा समितीचे सदस्य यांच्या निदर्शनास आलेले आहे.
शाळा शाळा सुरू झाल्यापासून एकही दिवस मेनू नुसार पोषण आहार दिलेला नाही. गॅस जास्त जळतो म्हणून भाजी आमटी किंवा उसळ पूर्णपणे व्यवस्थित शिजवली जात नाही. तर शाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत फक्त एकदाच पूरक आहार दिला गेलेला आहे, तेही फक्त तीन बिस्किट वाटप केले.वाटाणे देखील कमी शिजवता कच्चेच दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये पोटदुखीचे प्रमाण वाढलेले आहे.
पोषण आहारात भाजीपाला निकृष्ट व प्रमाण देखील अतिशय कमी असते.
पोषण आहार व्यवस्थित साठवलेला नाही त्यामुळे त्यात अळ्या किडे होत आहेत.शाळेतील शालेय पोषण आहारात शासनाकडून प्रती विद्यार्थी मिळणारे दर १ ली ते ५ वी, २.०८ रुपये
६ ते ८ वी, ३.११ रुपये याप्रमाणे शाळेस दररोज ४५० ते ५०० रुपये येतात. मात्र सध्याच्या अनुभवानुसार हे मुख्याध्यापक महाशय ५० ते १०० रुपयावर च बोळवण करतांना दिसत आहे.
तर मागील दिवसापूर्वी देखील शाळेचे पोषण आहाराचे तांदूळ परस्पर विक्री केल्याच्या प्रकरणात बदली करण्यात आली होती.
तर काहीच महिन्यात पुन्हा त्यांची बदली त्याच शाळेवर करण्याची बहादुरकी शिक्षण विभागाने दाखवली आहे. त्यामुळे यात काही प्रशासनाचे देखील हित संबंध आसेल की काय असा प्रश्न शाळा समिती सदस्यासह पालक वर्गाना पडत आहे. त्यामुळे आता तरी झोपी गेलेल्या प्रशासनाने जागं होऊन सदरील मुख्याध्यापकावर कार्यवाही करावी अशी मागणी ग्रा.पं.सदस्य प्रभू पाटील बनकर, ज्ञानेश्वर बनकर, विष्णू बनकर, समिती अध्यक्ष मारुती बनकर, उपाध्यक्ष सुभाष बनकर, दत्तू बनकर इत्यादी पालक यांनी केली आहे ….