लोहा – अवैध वाळु माफियांचा धंदा राञीच्या वेळी व पाहाटेच्या वेळात तुफान जोमात चालु आहे.रस्त्यावर ये..जा करणाऱ्या वाहनांना व रस्त्याच्या बाजूने चालणाऱ्या नागरिकांच्या मनात भयानक भिती निर्माण होऊन घबराट होत आहे.हा धंद्या पोलिस प्रशासन की महसूल प्रशासनाच्या नेतृञंनाखाली चालतो काय, अशी संतप्त प्रतिक्रिया रस्तावर जिव गमावलेल्या कुटुंबातील सदस्यांची आहे.
राज्य महामार्गावर अति वेगाने अवैध वाळु वहातुक करणाऱ्या वाहनांना नंबर प्लेट नसताना वाहातुक होते.या प्रकाराला आरटोओचे पाठबळ आहे काय.सूक्षित बेकार आसल्याने ,बेकार राहाण्यापेक्षा उपजिवेकेसाठी ऑटो चालून संसार चालवतात अशा वाहनांना पावबंद करण्याचे आदेश आहेत काय अशे नागरिकांसह सतत दंड भरणाऱ्या ऑटो चालकांकडून बोलले जाते.
तालुक्यासह लगतच्या तालुक्यात तसेच जिल्ह्यासह परजिल्ह्यात आजघडीला वाळू माफीयांच्या मनमानी कारभाराने अक्षरश: कळस गाठल्याचे चित्र असून वाळू वाहतुकीसाठी कोणत्याही प्रकाराची शासकीय परवानगी नसताना रात्रभर चोरटी वाळू वाहतूक केली जाते . अनधिकृत वाळू उपसा व वाहतुकीमुळे शासनाचा करोडों रुपयांचा महसूल बुडत असताना लोकप्रतिनिधींसह महसूल, पोलीस व आरटीओ प्रशासनाची मेहरबानी असल्यामुळेच वाळूचा गोरखधंदा जोमात चालू आहे.
नदीपात्रातून बेसुमार होत असलेल्या वाळू उपशामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे दिसून येत आहे. वाळू वाहतूक करणारे सर्वच हायवा टिप्पर विना नंबरचे असून भरधाव वेगातील बिदारक वातावरण आहे.टिप्पर अवैध वाहातुक मुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेकान जिव गमवावे लागेल ही भीती असताना या धंद्याला कोणाचे पाठबळ आहे.
तालुक्यातील बेटसांगवी, पेनुर, अंतेश्वर, भारसवाडा, चित्रावाडी, शेवडी (बा), येळी, हातनी या शिवारातून गोदावरी नदीचे पात्र वाहते. तालुक्याला गोदावरीचे मोठे वरदान लाभले असताना वाळूमाफिया झटपट श्रीमंत होण्याच्या कोणत्याही थराला जात आहेत.अधिकारी व कर्मचाऱ्यांना चिरीमिरी देऊन , सुस्त प्रशासनाला याचे गांभीर्य नाही.रस्त्यावर जिव गमावलेल्या कुटुंबाची अवस्था काय आहे याचा शासनाने विचार करावा. हायवा टिप्पर यांना क्रमांक नाहीत. एखादी अपघाताची घटना घडल्यास कोणत्या गाडीने अपघात झाला हे समजणार नाही. दीड वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत कंधार रस्त्यावर झालेल्या अपघातात उच्च शिक्षित मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या तरुणाला जीव गमवावा लागला होता.
अद्यापपर्यंत त्याला न्याय मिळालेला नाही अनधिकृत वाळू उपसा व वाहतूक होत असताना स्थानिक महसूल व पोलिस प्रशासन “हाताची घडी अन् तोंडावर बोट” अशाच भुमिकेत वावरत असल्याचे दिसून येत आहे. नांदेड जिल्हाधिकारी व जिल्हापोलिस अधीक्षक यांनी राष्ट्रीय महामार्गावर रात्री होत असलेला राञीचा खेळ स्वतः नियञंनाखली अवैध वाळू माफियांच्या मुसक्या आवळतील काय..? असा सवाल सर्व सामान्य जनता व जिव गमवलेले कुटुंब आणि सुक्षित तरुनाने तळमळीने बोलले जात आहे या धंद्यावर स्वतः जिल्हाधिकारी घटनास्थळी जाऊन धंदा बंद करुन जयमोक्यावर साहित्य जप्त करतो तालुका महसूल यंञना कोणाच्या दावणीला आहेत जिल्हापोलिस अधीक्षक यांनी पोलिस यंत्रणेला राञीला पेट्रोलिंग करणाऱ्या वहानात जिपीएस यंञनेची सुविधा देऊन कंट्रोल रुमला अट्याच करुन अवैध धंद्याला आळा घालावा अशी मागणी होत आहे.



























