मकरकंब – श्री.सदगुरू गजानन बाप्पांच्या ५७ व्या पुण्यतिथी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह, काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद आदी आध्यात्मिक विचारांची पर्वणीच करकंबकरांना लाभली. शुक्रवारी पहाटे ४.०० वा.गजानन बाप्पांच्या समाधीवर रुद्राभिषेक करत नामस्मरणाच्या मंत्रघोषत ६.५०मिनिटांनी पुष्पवृष्टी करण्यात आली.
या सोहळ्याप्रसंगी करकंब व पंचक्रोशीतील भक्त, भाविक,शिष्यगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुष्पवृष्टीनंतर पालखी मिरवणूक,नगर प्रदक्षिणा पार पडली. सद्गुरू गुरुवर्य.ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांचे काल्याचे कीर्तन उत्साही वातावरणात संपन्न झाले.कीर्तन सोहळ्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी करकंब,जवळा,खानापूर, इचलकरंजी परिसरातील भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गजानन बाप्पा सेवा मंडळ,शिष्यगण भजलिंग महाराज ट्रस्ट,श्री.गजानन काका नगरकर,भजलिंग महाराज ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब वास्ते,बाळासाहेब कुंभार,माऊली पिसे,ज्ञानेश्वर दुधाणे आदींनी परिश्रम घेतले.


















