छत्रपती संभाजीनगर – लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री.१००८ चिंतामणी पाश्श्र्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर येथे सालाबादाप्रमाणे 4 नोव्हेंबर ते6 नोव्हेंबर पर्यत वार्षिक यात्रा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन ५ नोव्हेबर रोजी मुख्य महामस्तकाभिषेक सोहळा होणार आहे. या महोत्सवासाठी डॉ प्रनाम सागर जी महाराज उपाध्याय विरजनसागर महाराज ससघ याचे 2 नोव्हेंबर रोजी आगमन झाले मुनिश्रीच्या पुढे महिला डोक्यावर मंगल कलश घेवुन पुढे चालत होत्या. सुमधुर बॅन्ड पथकाच्या सानिध्यात मुनिश्रीचे आगमन झाले.
चिंतामणी पाश्श्र्वनाथ भगवान की जय, आचार्य विरागसागरजी महाराज की जय जय कार, गुरâजी हमारे आये है, नई रोशनी लाये है. जैन धर्म की जय, अशा घोषणांनी संपुर्ण मंदिर परिसर दुमदुमला होता. तसेच ठिकठिकाणी साधुसतावर पुष्पवृष्टी व पादपुजा करण्यात येत होती. यावेळी शोभायात्रेत महिलांनी केशरी व पिवळया रंगाच्या साडया परिधान केल्या होत्या. यावेळी कचनेर क्षेत्रातर्फे आचार्य सघाचे पादपक्षालन करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष सुरेश कासलीवाल उपाध्यक्ष संजय कासलीवाल हेमंत बाकलीवाल महामत्री निलेश काला मनोज साहूजी ललीत पाटनी एम आर बडजाते विनोद लोहाडे जयकुमार बाकलीवाल संजय पहाडे शांतीलाल पहाडे मुकेश कासलीवाल अशोक अजमेरा पंकज गोधा पंकज पांडे विनोद पाटणी शैलेश रावका झुबरलाल रावका अमित बाकलीवाल महावीर पाटनी नितीन गंगवाल प्रकाश गंगवाल प्रवीण लोहाडे कीरन मास्ट सर योगेश गगवाल प्रकाश ठोले मनोज बडजाते स्वप्निल जैन प्रमोद गोसावी यांच्या समाज बांधवांची उपस्थिती होती यांच्यासह समाज बांधव व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. वार्षिक यात्रा महामहोत्सव प्रसंगी दिनांक ०४ नोव्हेंबर २०२५ ते दिनांक ०६ नोव्हेंबर २०२५ या तीन दिवसाच्या कालावधीसाठी महाप्रसादाचे आयोजन धर्मानुरागी दानशूर आदिनाथ स्टील ग्रुप द्वारा सौ. शिलादेवी झुंबरलालजी, सौ. निधी अल्केशकुमारजी, सौ. टीना शैलेशकुमाजी रावका, डॉ. मोतीलालजी, झुंबरलालजी, हिरालालजी, शांतीलालजी रावका परिवार देशमुखनगर (पांढरीवाला), छत्रपती संभाजीनगर यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
तरी समाज बांधवानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अशी माहिती प्रचार प्रसार सयोजक नरेंंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे.


















