खते बि-बियाण्याची चढ्या दराने विक्री; कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांची होत आहे लुट
वरुड येथील अवस्था तर अतिशय दयनीय प्रति युरीया बॅगसाठी मांगीतले जाते 400 रुपये
तभा वृत्तसेवा जाफ्राबाद, १७ जून –
जाफ्राबाद तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी खतांची जमवाजमव सुरू केली आहे. मात्र बियाणे व खतांची निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने विक्री होत आहे हे प्रकार रोखण्यासाठी तालुका कृषी कार्यालयाकडून नेमलेले भरारी पथक केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून आक्रोश व्यक्त केला जात आहे.
. पावसाने हजेरी लावल्याने परीसरातील शेतकऱ्यांनी खते टाकण्यास सुरुवात केली. आहे मागील वर्षात शेतीने शेतकऱ्याला म्हणावी तशी साथ दिली नाही. त्यामुळे चढ्या भावाने होणारी विक्री ही शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे त्यातच
दुकानदारांनी मनमानीने बी बियाणे व खतांची अधिक दराने विक्री करताना दिसत आहेत. दिवसेंदिवस खते व बियाण्याचे चढ्या दराणे विक्री सुरु आहे खताचां तुटवडा असल्याचे भासवून शेतकरी बांधवाची जादा दराने खते व बियाणे विक्री करून लूट करत आहेत.
पिकांवर सध्या विविध किडींनी आक्रमण केले असून, कीड नियंत्रणात आणताना शेतकरी मेटाकुटीस आले असतानाच आता तालुक्यातील कृषी सेवा संचालकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. खत आणि कीटकनाशकांची कृत्रिम टंचाई निर्माण करून ज्यादा दराने विक्री केली जात आहे. हा प्रकार कृषी विभागातील अधिकाऱ्यांना माहीत असला तरी कारवाई मात्र केली जात नाही. जाफ्राबाद तालुक्यात यावर्षी शेतकरी हतबल दिसत आहे. सुरूवातीला पावसाची दडी. त्यानंतर दुबार, पेरणीचे संकट़ खंड पडल्यानंतर पावसाला सुरूवात झाली. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र किडींनी आक्रमण केले. कीड नियंत्रणासाठी किटकनाशक आणि पिकांच्या वाढीसाठी खतांची आवश्यकता आहे. परंतु नेमकी हिच वेळ साधून कृषी केंद्र चालकांनी पिळवणूक सुरू केली आहे. तालुक्यातील वरुड , भारज बु अनेक गावांमध्ये कृषी साहित्याची ज्यादा दराने विक्री केली जात आहे. तालुक्यात कृषी हंगामाच्यावेळी युरिया मुबलक होता. मात्र सुरूवातीपासून पावसाने दडी मारल्याने युरियाची मागणी नव्हती. आता पाऊस चांगला झाल्याने आता युरियाची मागणी वाढली आहे. मात्र आता कृषी केंद्र चालक युरियाची कृत्रिम टंचाई करीत आहे. ज्यदा दर दिल्यास युरिया तात्काळ उपलब्ध करून दिल्या जातो. अनेक कृषी केंद्र चालकांनी आपल्या गोदामात युरियाची साठवण करून ठेवली आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी वाटेल ती किंमत मोजायला तयार असतो. यासोबतच औषधीची ही अशिच अवस्था झाली आहे.संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन होणारी लूट थांबवावी. अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधव करत आहेत.