सोलापूर – दरवर्षीप्रमाणे यावर्षी सोलापूर शहरातील एकूण १४ शाळांमधून १५० विद्यार्थ्यांनी पाठांतर स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता, यापैकी एकूण ३१ विद्यार्थी पारितोषिक प्राप्त ठरले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर उपस्थित होते.
समर्थ रामदासांच्या साहित्यात मनावर सुसंस्कार करण्याची क्षमता आहे. आयुष्याला योग्य दिशा देण्याची क्षमता आहे म्हणून त्यांची शिकवण आत्मसात केल्यास सुजाण सुसंस्कृत नागरिक निर्माण होऊ शकतात असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी आज (ता.२६) रोजी देऋब्रा संस्थेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात केले.
सोलापूर येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीने दासनवमी निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या पाठांतर स्पर्धेतील बक्षीसांचे वितरण डॉ. श्रीकांत येळेगावकर यांच्या हस्ते संस्थेच्या सभागृहात झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर, उपाध्यक्ष विजय कुलकर्णी, सहकार्यवाह नभा काकडे, महिला शाखा अध्यक्षा हेमा चिंचोळकर, युवक अध्यक्ष तथा स्पर्धा प्रमुख सुशांत कुलकर्णी आदीसह स्पर्धक विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते. बक्षिसपात्र विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र तर सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. सुशांत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
बक्षिस पात्र विद्यार्थी असे :
लहान गट :
प्रथम क्रमांक – अभय अविनाश कल्हाळीकर (गोपाबाई भै. दमाणी बालक मंदिर), द्वितीय क्रमांक – राही ओंकार कुलकर्णी (शि.प्र.मंडळी, शिशु शाळा, जुळे सोलापूर), तृतीय क्रमांक – सुरश्री सुशांत कुलकर्णी (संस्कार शिशु विहार), उत्तेजनार्थ – शुभ्रा गिरीधर मंठाळकर (गोपाबाई भै. दमाणी बालक मंदिर), आदिश्री अशोक उदगिरी (जडावबाई रामसुख चंडक बालक मंदिर)
मोठागट :
प्रथम क्रमांक विभागून – दादस नित्या शिवमूर्ती (शि.प्र.मंडळी, शिशु शाळा, जुळे सोलापूर), समर्थ मंगेश कुलकर्णी (श्री चतुरबाई श्राविका बालमंदिर सोलापूर), द्वितीय क्रमांक विभागून -हत्तुरे संनिधी संदीप (शि.प्र.मंडळी, शिशु शाळा, जुळे सोलापूर), इरा जयंत कुलकर्णी (गोपाबाई भै. दमाणी बालक मंदिर), तृतीय क्रमांक विभागून – रोहित मल्लिनाथ कोरे (श्री सिद्धेश्वर पूर्व प्राथमिक शाळा सोलापूर), रत्नपारखी राधेय प्रतीक (शि.प्र.मंडळी, शिशु शाळा, जुळे सोलापूर), उत्तेजनार्थ – आदित्य नागेश बुधडकर (जडावबाई रामसुख चंडक बालक मंदिर), आराध्ये सान्वी सचिन (शि.प्र.मंडळी, शिशु शाळा, जुळे सोलापूर)
पहिली :
प्रथम क्रमांक – आकांक्षा अभिजीत बापट (नुमवि मराठी शाळा), द्वितीय क्रमांक – श्लोक लक्ष्मण मुळे, तृतीय क्रमांक – ऋत्विक ऋषिकेश कडगंची, उत्तेजनार्थ – अद्विका मार्कंडेय आडम, मनस्वी अशितोष इंगवले (श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा)
दुसरी :
प्रथम क्रमांक – जान्हवी प्रमोद कोरुलकर, द्वितीय क्रमांक – अदिती विनायक जाधव, तृतीय क्रमांक – आयुष अजिंक्य गायकवाड, उत्तेजनार्थ – स्वराली अमरनाथ कस्तुरे (श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा), भूषणा महेश शिंदे (श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक शाळा सोलापूर)
तिसरी :
प्रथम क्रमांक – श्रेयस योगीनाथ किणगी, द्वितीय क्रमांक – संस्कृती लक्ष्मण मुळे (श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा), तृतीय क्रमांक – हुंडेकरी पृथ्वीराज गुरुनाथ (श्री वीरतपस्वी मराठी प्राथमिक शाळा), उत्तेजनार्थ – वेदिका विजयानंद वाडीकर (श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा), कुंभार श्रेयस श्रीकांत (श्री वीरतपस्वी मराठी प्राथमिक शाळा)
चौथी :
प्रथम क्रमांक – वेदांत संदेश वरेकर, द्वितीय क्रमांक – ओजस ओंकार कुलकर्णी (कै. वि. मो. मेहता प्राथमिक शाळा, जुळे सोलापूर), तृतीय क्रमांक – विवान नितीन वांढरे (श्री दिगंबर जैन गुरुकुल प्राथमिक शाळा)


























