समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू तर ४ गंभीर
जालना, २९ जून, (हिं.स) जालन्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावरील कडवंची जवळ झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४ गंभीर आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अरटीगा कारला डिझेल भरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिली. अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये कारचा चुराडा झाला. यात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला.