जालना – तालुक्यातील जाफ्राबाद शहर परिसरात काही काही दिवसांपूर्वी थोड्या फार प्रमाणात वाळु तस्करांनवर कार्यवाही केली. प्ररतु राञी होणारी वाळू तस्करी तहसीलदार सारिका भगत यांच्या कार्यवाही ला न जुमानता भर दिवसा जाफ्राबाद
तहसील कार्यालयासमोरुन हायवा टिप्पर भरून जातात.
मोठ्या प्रमाणावर वाळू निमखेडा रोड लगत असलेल्या शेतात पूर्ण नदीच्या पात्रातून वाळू साठा केला जातो. त्यानंतर जवखेडा ठेंग ,व देऊळझरी शिवारातील पुर्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरूच आहे. दरम्यान या वाळू चोरीकडे महसूल विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे.
महसूल विभागाने वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल चे काही पथक रात्रीला गस्त घालत असते तरीही केळणा नदीपात्रात केलेले खड्डे काही वाळू माफियांकडून मध्यरात्रीच मोठ्या प्रमाणात मुरूम टाकून बुजवण्यात आले. त्यानंतर नव्याने तयार केलेल्या रस्त्याद्वारे दररोज रात्री ट्रॅक्टरने जवखेडा ठेंग येथील मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक सुरू असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार महसूल विभागातील सर्कल तलाठ्यांना याबाबत वारंवार सांगुन देखिल कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये वेगवेगळ्या चर्चा होत आहे. नदीपात्रातून सुरू असलेल्या चोरटी वाळू वाहतुकीबाबत माहिती दिल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या नदीपात्रा असलेल्या पाइपलाइनचे नुकसान करणे, धमकावणे असे प्रकार सतत घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.






















