तभा फ्लॅश न्यूज/जमीर काझी : झारखंड मधील मद्य घोटाळ्यात अटकेतील सुमीत फॅसेलिटीजच्या अमित साळूंखे याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे पुत्र खा.श्रीकांत शिंदे याच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. त्याने राज्यात रुग्णवाहिकेचा शेकडो कोटींचा घोटाळा केला आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी केला.
राज्यातील हा सर्वात मोठा घोटाळा असून आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले आहे. श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशन हे उपमुख्यमंत्र्यांचे बाळराजे चालवतात. या फाऊंडेशनमध्ये आलेला पैसा हा भ्रष्ट मार्गाने आलेला असून अमित साळुंखेने त्यांना देणग्या दिल्या असून रुग्णवाहिका 108 कंत्राट मिळविले आहे. फडणवीस यांनी, संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करून ते पूर्णपणे बदलणे आवश्यक आहे. जे मंत्री भ्रष्ट आहेत.
रमी खेळतात, टॉवेल बनियानवर बसून नोटांनी भरलेली बॅग बाळगतात,जे लेडिज, डान्स बार चालवतात. अशी मंत्री आपल्या मंत्रिमंडळात आहेत. ते नैतिकतेच्या गप्पा मारत असून त्यांच्या कानाचे पडदे साफ केले पाहिजे. विरोधी पक्ष जे काही बोलतोय ते गांभीर्याने घ्या. नाहीतर झारखंडचे पोलीस येतील आणि तुमच्या मंत्र्याला, खासदाराला अटक करुन घेऊन जातील, असा घणाघात राऊतांनी घालून ते म्हणाले. सुमीत फॅसेलिटीजला कल्याण-डोबिंवलीमधील घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट 800 कोटीला बेकायदेशीररित्या शिंदेंनी दिल्याचा आरोप राऊतांनी केला