सोलापूर – श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूरची विद्यार्थीनी संस्कृती गवंडी हिने भरतनाट्यम नृत्यच्या ४ थ्या परीक्षेत शहरात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या भरतनाट्यम मध्यमा प्रथम (४ थी) परीक्षेत संस्कृतीने प्रथम श्रेणी मिळवित शहरात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. या यशाबद्दल तीचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
संस्कृतीस श्रीनिअंबा नृत्यालयाचे प्रमुख श्रीनिवास काटवे आणि सौ. अंबीका काटवे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
श्री सिद्धेश्वर देवस्थानचे प्रमुख धर्मराज काडादी, मुख्याध्यापक योगेश राऊत, नीता तमशेट्टी, रेणुका अरोरा,सुधा ऊमदी आदी मान्यवरांनी तीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

















