जालना – पारध (शाहूराजा ) येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
पराशर ऋषीं महाराज मंदीर येथे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीला देवेंद्र चैतन्य स्वामी सावंगीकर (अ) यांनी संताजी महाराज यांच्या जिवन कार्यावर आध्यात्मिक प्रवचन दिले.
संताजी महाराज यांचे पुजन करुन आरती करण्यात आली. व भंडार्याचे (महाप्रसाद )चे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात माजी सभापती श्री परमेश्वर पा लोखंडे,उपसरपंच श्री शेखर भैय्या श्रीवास्तव, श्री समाधान लोखंडे गुरुजी माजी सरपंच गणेश पाटील लोखंडे, ज्ञानेश्वर पाटील लोखंडे,रामेश्वर सहकारी साखर कारखाना चे संचालक श्री संजय लोखंडे, महेंद्र लोखंडे,संजय कतोरे, सुरेश अल्हाट,सूरेश देशमुख, रविंद्र लोखंडे सर , उदयसिंह लोखंडे, यांच्या सह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
हि जयंती साजरी करण्यासाठी संतोष पाखरे,राजु पाखरे,जनार्धन पाखरे, गणेश पाखरे,सतिश पाखरे, सुनिल पाखरे, अमोल पाखरे, विठ्ठल राऊत, गजानन सोनुने सह समस्थ पाखरे परिवार यांनी परिश्रम घेतले


























