परभणी : बंजारा समाजातील प्रभावी नेते आणि कुन्हाडी ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष राठोड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोडून भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. परमणी येथे शनिवारी (दि. २५ ऑक्टोबर) झालेल्या भव्य कार्यक्रमात जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार अशोक चव्हाण आणि माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमाला कुन्हाडी
आणि वाधी धानोरा सर्कल मधील असंख्य कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राठोड यांच्या प्रवेशामुळे या भागातील भाजपची संघट नात्मक ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, या प्रवेशा मुळे वाधी धानोरा सर्कल मधील माजी आमदार विजय भांबळे यांच्या गटाला एकप्रकारे धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. संतोष राठोड हे बंजारा समाजात मोठे प्रभावशाली व्यक्तिमत्व असून, ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंजारा ब्रिगेडियर सेलचे तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. समाजातील सर्व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी नेहमी आघाडीवर राहणारे राठोड यांनी आपल्या कार्य काळात
सामाजिक आणि विकासात्मक उपक्रमांवर भर दिला. त्यांच्या प्रवेशानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत या सर्कलमध्ये मोठी चुरस निर्माण
होण्याची शक्यता आहे. भाजपनेही त्यांच्या स्वागताने बंजारा समाजात आपले अस्तित्व अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले
जात आहे. यावेळी बोलताना संतोष राठोड म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वा खाली देश व राज्य प्रगतीच्या वाटेवर आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्या साठी आणि विकासाच्या दिशेने अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे,” असे ते म्हणाले. भाजपच्या जिल्हा नेतृत्वाने राठोड यांच्या प्रवेशाचे स्वागत करत, “यांच्या नेतृत्वा मुळे वाधी धानोरा परिसरात भाजपला नवे बळ मिळेल,” असा विश्वास व्यक्त केला.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















