पाचनवडगावाला विकासाच्या प्रवाहात आणणार – सतीश घाटगे
भाजपच्या युवा व ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या शाखाचे जल्लोषात उद्घाटन
तभा वृत्तसेवा अंबड घनसावंगी प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
अंबड घनसावंगी 16 जुलै विकासापासून आणि मुलभूत सोयी सुविधा पासून वंचित असलेल्या जालना तालुक्यातील पाचनवडगावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचा शब्द भाजपा नेते सतीश घाटगे यांनी दिला. मंगळवारी पाचनवडगावात भाजपच्या नूतन शाखांचे मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले. याप्रसंगी गावातील स्मशानभूमीचा प्रश्न सोडविण्यासाठी या कामाचे उद्घाटन देखील सतीश घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले.
सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी भाजपाच्या नूतन शाखेचे मोठ्या उत्साहात उद्घाटन सोहळा पार पडला. या प्रसंगी गावातील अनेक युवकांनी गावाच्या विकासासाठी भाजपात प्रवेश केला. नूतन शाखेतील सर्व युवा व ज्येष्ठ कार्यकर्त्याचे सतीश घाटगे यांनी पक्षात स्वागत करून सत्कार केला.
मुलभूत सुविधापासून वंचित असलेल्या या गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक सर्व ते प्रयत्न करण्याचा शब्द घाटगे यांनी गावकऱ्यांना दिला. गावातील स्मशानभूमीचा प्रश्न गावकऱ्यांनी त्यांच्याकडे मांडला होता. तो सोडविण्यासाठी तत्काळ या कामाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास संजय आटोळे, परीक्षित शिंदे, लक्ष्मण शिंदे, रामा आटोळे, परमेश्वर करपे ,कारभारी महाराज आंभोरे, तुकारामजी नीलखन, पंडित शिंदे, विकास भुतेकर, सुभाष पवार, गणेश शिंदे, योगेश काटे, बहादूरसिंग खंदाडे, विनोद सुल्ताने, बाबाजी मिराळे, काठ्ठू मिया शेख, कृष्णाभाऊ आदमने यांच्यासह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.