अंगणवाडी सेविकेच्या मुलीच्या लग्नासाठी सतीश घाटगे यांची २१ हजाराची मदत
तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
घनसावंगी अंबड 16 जुलै: समृद्धी साखर कारखान्याच्या शुभमंगल कन्यादान योजने अंतर्गत कवठा ता. जालना येथील अंगणवाडी सेविका सौ. शिलाताई विनोद विभुते यांच्या मुलीच्या लग्नासाठी सतीश घाटगे यांनी २१ हजाराची मदत कन्यादान म्हणून केली.
सामाजिक बांधिलकीच्या नात्याने समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी व समृद्धी ट्रस्टच्या अध्यक्षा वैशालीताई घाटगे यांनी दोन वर्षापूर्वी शुभमंगल कन्यादान योजना सुरु केली.
आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व गट प्रवर्तक यांच्या मुलीच्या लग्नासाठी मदत म्हणून कन्यादान स्वरुपात ही मदत सतीश घाटगे करत आहेत. कवठा ता. जालना येथील अंगणवाडी सेविका सौ. शिलाताई विनोद विभुते यांच्या मुलीच्या लग्नासाठी सतीश घाटगे यांनी ही मदत केली.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते पोकळे बप्पा, विजयाताई देशमुख, सुनिल पोकळे, मधुकर देशमुख, डाॅ. अनिकेत वरखडे, डाॅ. देशपांडे, विष्णु काळे, , विनोदराव विभुते, विजय वरखडे, राजेंद्र छल्लारे सर ,माजिद काझी आदी उपस्थित होते.