सांगोला – सांगोल्यातील उत्कर्ष प्राथमिक विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कुलकर्णी यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी पर्यवेक्षक भोसले, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका शास्त्री, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका मागाडे उपस्थित होत्या. यावेळी शिक्षिका पवार व इ.४ तील विद्यार्थिनी सारण्या चंदनशिवे, श्रेया लेंडवे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी माहिती सादर केली. या सादरीकरणामुळे कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरला.
यावेळी चित्रलेखन, माहिती लेखन, निबंध लेखन, शब्दकोडी या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका मागाडे, उपमुख्याध्यापिका कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

























