बार्शी – दि. ३ जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीमाई व दि. १२ जानेवारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त महात्मा फुले शाळा, सौंदरे येथे भव्य विज्ञान प्रदर्शन, तालुका स्तरीय व जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धा विदयार्थी सन्मान सोहळा, क्रिडो ॲक्टिव्हिटी, पालक सहविचार सभा आणि संक्रांतनिमित्त हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
विज्ञान प्रदर्शन उद्घाटन. ्श्री. राजेंद्रभाऊ सुरवसे (सरपंच, उद्योजक) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समस्त पालक, ग्रामपंचायत सदस्य, अनेक मान्यवर उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. राहुल वाणी (ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, बार्शी), सचिव अजय तिवारी, क्रिडो पदाधिकारी, मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
प्रथमत प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल वाणी व अजय तिवारी यांच्या हस्ते पालकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गणेश गोटे सर यांनी केले, तर अजय तिवारी यांनी पालकांना मार्गदर्शन केले, कार्यक्रम यशसवी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.




















