ध्वजारोहण म्हणजे काय?
ध्वजारोहण दिवशी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ध्वजारोहण करतात.
– स्वातंत्र्यदिनी तिरंगा खांबाच्या तळाशी बांधला जातो, जो स्ट्रिंगने खेचून वर आणला जातो आणि नंतर फडकवला जातो.
ध्वजारोहण हे नवीन राष्ट्राच्या उदयाचं प्रतीक मानलं जातं. – हे भारताचा उदय आणि ब्रिटिश राजवटीचा अंत म्हणून देखील चिन्हांकित आहे.
ध्वजवंदन म्हणजे काय?
– प्रजासत्ताक दिनी देशाचे राष्ट्रपती राजधानी दिल्लीत असलेल्या राजपथावर तिरंगा फडकवतात.
• यादिवशी ध्वज हा खांबाच्या वरच्या बाजूला आधीच बांधलेला असतो. जो स्ट्रिंगमधून खेचून राष्ट्रपती उघडतात.
ध्वज फडकवणे हे राष्ट्राचं पंख पसरून नवीन युगाची व्याख्या म्हणून पाहिलं जातं.