सांगोला – तालुक्याचे स्व.आ.काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दि.१४ जानेवारी रोजी जवळा (ता.सांगोला) येथे स.१० ते दु. ४ पर्यंत त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी समाधी दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाणी प्रश्नाचा पाठपुरावा करतानाच त्यांनी जगाचा निरोप घेतला.
सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण तालुक्यातील तरुण पिढीला व्हावी आणि त्यांच्या कार्यापासून तरुणांनी प्रेरणा घेऊन राजकारण आणि समाजकारणात सक्रीय व्हावे यासाठी व त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा समाधी दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी अभिवादन करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन साळुंखे-पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.


















