ज्येष्ठ कार्यकर्ते हेच माझ्या राजकीय आयुष्याचे खरे शिलेदार –
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे.
भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे की जो सर्वांना सोबत घेऊन सर्व समाज घटकातील सर्वसमावेशक नेतृत्व घडविण्याचे काम करतो आणि त्यामधून कार्यकर्ता घडतो.
माझ्या 45 वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये सरपंच ते केंद्रीय मंत्री केले माझ्यासोबत सर्व जुन्या सहकाऱ्यांनी मला खंबीर साथ दिल्यामुळेच ही राजकीय उंची गाठली आणि या जेष्ठ कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिले म्हणून ज्येष्ठ कार्यकर्ते हे माझ्या राजकीय आयुष्याचे खरे शिलेदार आहेत असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे साहेब यांनी आमदार संतोष पाटील दानवे यांच्या प्रचारार्थ आयोजित ज्येष्ठ कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत असताना केले.
पुढे बोलताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी करून त्यांच्या सुखदुःखामध्ये प्रत्येक वेळी सहभागी झालो त्यामुळेच त्यांनी मला इथपर्यंत साथ दिली असेही ते यावेळी म्हणाले.
या सर्व माझ्या जुन्या सहकाऱ्यांनी अनेक हाल अपेष्टा सहन करून पक्षाचे एकनिष्ठतेने आजपर्यंत काम केले आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला तरी सुद्धा आहे एकनिष्ठ कार्यकर्ते माझ्यासोबत आहे त्यामुळे मला माझ्या कार्यकर्त्यावर खूप विश्वास असल्याचे ते म्हणाले.
ज्येष्ठांचा आशीर्वाद हीच माझी राजकीय कमाई – आमदार संतोष पाटील दानवे
पैसा,संपत्ती या वैभवापेक्षा माझ्या राजकीय आयुष्यामध्ये ज्यांनी माझ्या वडिलांना 35 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं आणि मला सुद्धा आशीर्वाद देत आहेत हा ज्येष्ठांचा आशीर्वाद हीच माझ्या राजकीय आयुष्यातली सर्वात मोठी कमाई असल्याचे प्रतिपादन आमदार संतोष पाटील दानवे यांनी जेष्ठ मेळावा कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत असताना व्यक्त केले.
मी गेल्या दहा वर्षांमध्ये मतदारसंघांमध्ये अनेक विकास कामे केली त्यामुळे मला आपल्यासह सर्वांची साथ मिळत आहे असेही ते म्हणाले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नाना भागिले, विजय नाना परिहार, संतोष पाटील लोखंडे, सुरेश दिवटे सर, भाऊसाहेब जाधव, साहेबराव कानडजे,दगडूबा गोरे, राजेश पाटील चव्हाण,दीपक पाटील वाकडे, दत्तू पाटील पंडित, सुधीर पाटील,तुळशीराम पायघन, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष दत्तू पाटील अंभोरे, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष दत्ता पाटील बंगाळे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.