तभा फ्लॅश न्यूज/भोकरदन : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या भोकरदन तालुका महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष डॉ सौ सुनीता सुभाष सावंत यांनी पती डॉक्टर सुभाष सावंत व समर्थकांसह शनिवार दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी भोकरदन येथे राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे व पंचायत राज समितीचे अध्यक्ष तथा आमदार संतोष पाटील दानवे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे हे भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले होते. महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.
पक्षप्रवेश केलेल्या समर्थकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष सोनाबाई कडूबा कोल्हे, सताबाई एकनाथ सुरडकर, लक्ष्मी शांताराम तळेकर, शारदाबाई जयवंत जाधव, रंजना शंकर बोर्डे, शशिकला नाना सुसर, लता हरिभाऊ चोरमारे, नंदा अंकुश चोरमारे, रेखा दत्तू दळवी, मंदा दत्तू तळेकर, रुक्मण विश्वनाथ सावंत, सुनिता भगवान सावंत, रंजना प्रभाकर सुरडकर, मंगल सुखदेव सुरडकर आणि संगीता रामेश्वर जंजाळ यांचा समावेश आहे.
पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे पंचायतराज समितीचे अध्यक्ष तथा आमदार संतोष पाटील दानवे यांनी पक्षांमध्ये स्वागत करत पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.