काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी फुटीवर निकाल देत शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांना दिलं आहे.
दरम्यान, आता शरद पवार गटाला स्वतंत्र मान्यता मिळाली आहे. शरद पवार गटाला आज 4 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाला नाव आणि चिन्ह कळवायचं आहे. जर शरद पवार गटाने वेळेत चिन्ह आणि नाव न दिल्यास अपक्ष म्हणून मान्यता मिळेल.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार गटाकडे उगवता सूर्य आणि चष्मा हे दोन चिन्ह निवडण्याचा पर्याय आहे. मात्र आता ते कोणते चिन्ह निवडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
निवडणूक आयोगाचा हा निकाल काय सांगतो?
निवडणूक आयोगाने अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे अजित पवारांनाच नाव आणि चिन्ह वापरता येईल. महाराष्ट्र राज्यातील 41, नागालँडमधील 7 आमदार अजित पवारांकडे आहेत. तर लोकसभेचे दोन खासदार अजित पवारांकडे आहेत.


















