मोहोळ : शिवसेनेचे ओबीसी विभागाचे राज्य प्रमुख रमेश बारसकर यांनी शहाजहान बागवान यांची शिवसेना ओबीसी विभाग सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या नगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग ३ मधून शिवसेना ( शिंदे गट ) ओबीसी विभागाचे राज्य प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार मोहीम राबविण्यात आली. या प्रचार मोहिमेसाठी सर्वाधिक कार्यक्षम यंत्रणा उभी करून जास्तीत जास्त मते मिळवण्यासाठी शहाजहान बागवान यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.
घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद, संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांना एकत्र बांधणे, गनिमा कावा आणि प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यात शहाजहान बागवान यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे प्रभाग क्रमांक तीनमध्ये शिवसेनेला मोठे यश मिळाले.
या भरीव आणि निष्ठावान कार्याची दखल घेत शिवसेनेचे ओबीसी विभागाचे राज्य प्रमुख रमेश बारसकर यांनी शहाजहान बागवान यांची शिवसेना ओबीसी विभाग सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली आहे.
या नियुक्तीमुळे शिवसेनेच्या ओबीसी समाज संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळणार असून, पक्षाच्या आगामी कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. शहाजहान बागवान यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
























