देगलूर – श्री ब्रेन मास्टर फाउंडेशन संस्था, महाराष्ट्र (पुणे) यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी घेण्यात येणाऱ्या बुद्धिमत्ता मेन्स स्कॉलरशिप परीक्षेची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा दि. 31 जानेवारी 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे.
ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता, तार्किक विचारशक्ती व स्पर्धात्मक क्षमतेचा विकास करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असून राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षक व मुख्याध्यापकांनी या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना योग्य ती माहिती देऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी होत असल्यामुळे नियोजनबद्ध तयारी करून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे संचालिका अनिता पाटील व संस्थापक प्रवीण पवार यांनी सांगितले.






















