अक्कलकोट – श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोट नगरीतून राज्यभरामध्ये अध्यात्माचीकास जोडणाऱ्या समर्थनगरी परिवाराच्या माध्यमातून राज्यभरामध्ये मोठ्या भक्तीमय वातावरणात श्री स्वामी समर्थ प्रकटदिन पारायण, मानसपुजा, नामस्मरण व स्वामीनामाच्या गजरात साजरा करण्यात आला.
समर्थ नगरी प्रतिष्ठान अक्कलकोटच्या वतीने प्रति वर्षा प्रमाणे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन ते पुण्यतिथीच्या दरम्यान २७ दिवस लिखित नामजप सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे . या सोहळ्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व राजस्थान आदि राज्यातून मोठ्या प्रमाणात स्वामी भक्तांनी सहभाग नोंदविला आहे . ऑन लाईन नोंदणी देखील झाली आहे .ज्या स्वामीभक्तांनी या सोहळ्यात सहभाग घेतला आहे त्याची नोंदणी देखील संस्थेच्या वतीने करण्यात आलेली आहे. लिखित नामजप पूर्ण झाल्यावर अक्कलकोट येथे दिलेल्या पत्त्यावर या वह्या मागविल्या जाणार आहेत . श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे ,महिला अध्यात्मिक समितीतील सर्व सदस्य यांच्या माध्यमातून विधिवत पूजन करून श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहेत . लिखित वह्यांचे रूपांतर मंदिरात असलेल्या उदीमध्ये व उदी बांधण्याकरिता केला जाणार आहे .
चौकट – अमेरिकेत देखील नामस्मरणात उत्सव
प्रकट दिन निमित्त सांगोला,मिरज, कोल्हापूर , रत्नागिरी ,देवगड , पुणे, सातारा, कराड ,मुंबई, नाशिक, पालघर ,नांदेड ,अ.नगर, ठाणे ,इंदापूर , सोलापूर, संभाजीनगर ,चांदेवाडी कोल्हापूर , चंद्रपूर , नागपूर , आदिसह कर्नाटकातील चिकोडी ,बेळगाव , बेंगलोर राजस्थान ,गुजरात व (यु एस ए )अमेरिका येथील स्वामी भक्ताने समर्थ नगरी परिवाराच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात श्री स्वामी समर्थ प्रकटदिन नामस्मरणामध्ये साजरा केला.
चौकट – पुणे येथे समर्थ नगरीच्या माध्यमातून बिबेवाडी या ठिकाणी चौथ्या साधनावर्गाची सुरुवात करण्यात आली .उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथे श्री स्वामी समर्थ नामस्मरण व ध्यानसाधनालयाची जागा नामस्मरणाच्या माध्यमातून पवित्र करून साधना वर्गास सुरुवात करण्यात आली .
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे , श्री स्वामीभक्त चोळाप्पा महाराजांचे वंशज वे .शा. सं. अण्णू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थापक अध्यक्ष सैदप्पा इंगळे यांच्या नियोजनुसार राज्यभरामध्ये समर्थ नगर परिवाराच्या माध्यमातून हा सोहळा संपन्न झाला .























